धैर्य

धैर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे.

ऐका टिटवीने समुद्रकिनाऱ्यावर आपली अंडी घातली होती; परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्द झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही. म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अश्यक्यप्राय: धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान विष्णूंचे वहाण, महाकाय गरुडाच्या कानी हि गोस्ट गेली. त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे अश्वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीचे अंडी परत देण्यास सांगितले, अन्यथा तो स्वतः समुद्राला आटविण्याचे, टिटवीचे काम पत्करील. याप्रमाणे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली.

त्याप्रमाणेच भक्तियोगाचा योगाभ्यास कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने आणि धैर्याने नियमांचे पालन करतो, त्याला भगवंत नक्कीच साहाय्य करतात, कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात..

Comments